मराठी साहित्य विकसन



साहित्य 


1. ललित वाङ्मय

2. काव्य

3. वाङ्मयाचे वर्गीकरण

4. साहित्याचे प्रयोजन


मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने 'साहित्य' असे संबोधिले जाते. जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्धिक अशा विविध अंगांनी घडविलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक, वास्तव अशा भिन्न- भिन्न स्तरांवरचे सर्वांगीण, सम्यक दर्शन साहित्यातून वाचकांस प्रतीत होते. 'लिटरेचर'या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये 'साहित्य' वा 'वाङ्मय' हे पर्याय सामान्यतः समानार्थी म्हणून वापरले जातात. 'Littera' या मूळ लॅटिन शब्दापासून 'लिटरेचर' हा शब्द निर्माण झाला. Littera ही संज्ञा प्राचीन असून तिचा अर्थ वर्णमालेतील अक्षर वा अक्षरे, असा होतो. लिटरेचर ह्या संज्ञेला काळाच्या ओघात अनेक लेखक, समीक्षक, वाङ्मयेतिहासकार आदींनी साहित्याचा सर्वसमावेशक वा विवक्षित मर्यादित अर्थ विचारात घेऊन नानाविध अर्थ व अर्थच्छटा यांची परिमाणे बहाल केली. त्यांतून या संज्ञेचा अर्थविस्तार होऊन ती बहुआयामी व व्यापक, विस्तृत बनली. जे जे लिहिले जाते ते ते, म्हणजे सर्व लिखित मजकूर म्हणजे साहित्य, ही एक टोकाची व्याख्या काही तज्ज्ञांनी केली. अर्थातच ही भूमिका क्वचितच व अपवादाने घेतली गेल्याचे दिसते. याउलट दुसरी टोकाची भूमिका म्हणजे इलिअड, ओडिसी, हॅम्लेट अशा केवळ अभिजात विश्वसाहित्याचाच निर्देश 'साहित्य' या संज्ञेने केला जावा, ही भूमिकाही फारशी स्वीकारार्ह ठरली नाही. या दोन टोकांच्या मध्ये अनेक परस्परभिन्न, विविधांगी भूमिका व दृष्टिकोण घेतले गेल्याचेही दिसून येते. लिटरेचर ही संज्ञा सैलसर व व्यापक अर्थाने अनेक संदर्भात वापरली जाते. मराठीतील साहित्य व वाङ्मय या संज्ञांबाबतही हेच


साहित्याचे स्वरूप आणि समीक्षेच्या चार पातळ्या


कोणत्याही साहित्यकृतीचा आस्वाद घेतल्यानंतर त्या साहित्यकृतीविषयी आपल्या मनात काही न काही अभिप्राय तयार होत असतो मात्र प्रत्येक अभिप्रायाला आपण समीक्षा म्हणत नाही. तर सामिक्षेकरीता आपला अभिप्रायह सार्वत्रिक निकषांवर आधारित असावा लागतो, तरच तो अधिक तर्कशुद्ध आणि व्यापक स्वरूपाचा होतो. तसेच तो साहित्यकृतीचे स्वरूप, कार्य, सौंदर्य आदींच्या दृष्टीने प्रस्तुत आणि यथोचित शब्दांतून व्यक्त व्हावा लागतो. यावरून आपल्याला साहित्यसमीक्षेची एक स्थूल व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईलः "सार्वत्रिक निकषांची आकांक्षा धरणारा, यथोचित शब्दांतून व्यक्त होणारा, साहित्याविषयीचा मुल्यगर्भ आणि ज्ञानगर्भ अभिप्राय म्हणजे समीक्षा"


साहित्यसमीक्षा एक व्यापक स्वरुपाची प्रवाही प्रक्रिया असून त्यात साहित्यकृतीचे वाचन, विश्लेषण, अर्थनिर्णयन आणि मूल्यमापन ही प्रमुख अंगे सामावलेली असतात. समीक्षेच्या चिंतनशील व्यापारात कल्पनाशक्ती व स्वयंप्रज्ञा कार्यशील असतात. त्या साहित्यकृतीचे सौंदर्यमूल्य जाणून घेण्यात आणि निर्माण करण्याच्या कामात साह्यभूत होतात. समीक्षाव्यापाराचे हे अनेकांगी प्रवाही स्वरूप काय आहे हे साकल्याने पाहिल्याशिवाय सुविकसित, प्रगल्भ समीक्षेची संकल्पना सुस्पष्ट होणार नाही. तसेच ज्या साहित्यकृतीची समीक्षा करावयाची तिचे स्वरूप कसे असते याची जाण समीक्षकाला असावी लागते. त्यामुळे समीक्षेच्या पातळ्या पाहण्यापूर्वी साहित्याचे स्वरूप कसे असते ते पाहू.


साहित्याचे स्वरूपः


साहित्याचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी साहित्यकृतीच्या प्रमुख अंगांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. प्रा. गंगाधर पाटील यांच्यामते साहित्यकृतीला सात अंगे असतात. ती पुढीलप्रमाणेः


१) साहित्यकृती ही शब्दांनी बनलेली असते. शब्दांचे ध्वनिरूप, अर्थरूप आणि वाक्यविन्यासात्मक रूप घटकांनी तिची घडण होते. हे भाषिक अंग होय.


नवभारत' अंतर्गत साहित्याचे प्रवाह आणि प्रकार


डॉ. प्रतिभा प्रदीप पाटणे


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मराठी माध्यमांच्या शाळांची घटती संख्या