Posts
मराठी साहित्य विकसन
- Get link
- X
- Other Apps
साहित्य 1. ललित वाङ्मय 2. काव्य 3. वाङ्मयाचे वर्गीकरण 4. साहित्याचे प्रयोजन मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने 'साहित्य' असे संबोधिले जाते. जीवनव्यवहाराचे भावनिक, आध्यात्मिक, बौद्धिक अशा विविध अंगांनी घडविलेले सर्जनशील, वैचारिक, कल्पनात्मक, वास्तव अशा भिन्न- भिन्न स्तरांवरचे सर्वांगीण, सम्यक दर्शन साहित्यातून वाचकांस प्रतीत होते. 'लिटरेचर'या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये 'साहित्य' वा 'वाङ्मय' हे पर्याय सामान्यतः समानार्थी म्हणून वापरले जातात. 'Littera' या मूळ लॅटिन शब्दापासून 'लिटरेचर' हा शब्द निर्माण झाला. Littera ही संज्ञा प्राचीन असून तिचा अर्थ वर्णमालेतील अक्षर वा अक्षरे, असा होतो. लिटरेचर ह्या संज्ञेला काळाच्या ओघात अनेक लेखक, समीक्षक, वाङ्मयेतिहासकार आदींनी साहित्याचा सर्वसमावेशक वा विवक्षित मर्यादित अर्थ विचारात घेऊन नानाविध अर्थ व अर्थच्छटा यांची परिमाणे बहाल केली. त्यांतून या संज्ञेचा अर्थविस्तार होऊन ती बहुआयामी व व्यापक, विस्तृत बनली. जे जे लिहिले जाते ते ते, म...
मराठी माध्यमांच्या शाळांची घटती संख्या
- Get link
- X
- Other Apps
मराठी माध्यमांच्या शाळांची घटती संख्या मराठी शाळा बंद पडत आहेत, याला जबाबदार कोण, हे नेमके सांगता येणार नाही. याचे कारण अनेक घटक या गोष्टीला कारणीभूत आहेत. शासन आणि प्रशासन यांच्यातील हलगर्जीपणा आहेच, मात्र सोबत मराठी माणूस सुद्धा आहे. त्यामुळे नेमके अमुक अमुक दोषी, असे सांगता येणार नाही. याच प्रश्नातील दुसरा प्रश्न म्हणजे, तंत्रज्ञान युक्त मराठी शाळा झाल्यास चालतील का? या प्रश्नाला प्रतिप्रश्न. करेन मी की, तंत्रज्ञान हे एकमेव कारण आहे का मराठी शाळांपासून विद्यार्थी दूर जात आहेत? तर नाही. भाषा हा घटक मराठी शाळेपासून विद्यार्थी दूर जात असण्याला आहे. तो कसा, तेही पाहू. मराठी शाळा तंत्रज्ञान संपन्न, सोई सुविधा युक्त, चकचकीत झाली, तर लोक मराठी शाळेकडे वळतील का? तर नाही. याचे कारण इंग्रजी शाळेकडे असणारा ओढा हा भाषेमुळे आहे. तो कसा तर, इंग्रजी शिकल्याने पुढे अनेक संधी निर्माण होतात, मराठीतून शिकून पुढे संधी मिळत नाहीत, हे मराठी लोकांच्या डोक्यात घट्ट रुजले आहे. म्हणून मध्यमवर्गीय सोडा गरीब घरातील मुलांनाही त्यांचे पालक कसोशीने प्रयत्न करून, दिवस रात्र राबून इंग्रजी शाळेत टाकण्याचा प्रयत...